Wednesday, July 20, 2022

नामांतर झाले पण आता पुढे काय?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता जाता औरंगाबादचे 'संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण केले. यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' नामकरणाचा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजूर केला यामुळे गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न एकदाचा सुटला असे म्हणले तर वावगे ठरणार नाही, याचा आनंद असला तरी ज्या मुद्द्यावरून गेली अनेक वर्षे राजकारण्यांनी आपली पोळी भाजली एकदाचा तो मुद्दा बाजूला गेला, याचाही आनंद सर्वसामान्य नागरिकांना झाला असावा.‌ एकदाचे नामांतर झाले पण आता पुढे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. कारण औरंगाबाद शहराचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न नामांतर झाल्यावरही प्रलंबितच राहतील. मग नामांतर करून नेमके साध्य झाले तरी काय ? असाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत असेल.‌ जशी एखाद्या माणसाची ओळख आपल्या नावाने नाही तर आपल्या कर्तुत्वाने होते. तशीच एखाद्या शहराची ओळख ही त्याच्या नावाने नव्हे तर त्या ठिकाणी असणाऱ्या सोयी सुविधांनी निर्माण होते असे माझे वैयक्तिक मत आहे. आता एकदाचे नामकरण झाले, किमान आता तरी सर्व राजकीय नेते, पुढारी या विषयाला बाजूला ठेवून विकासाकडे लक्ष देतील का असा सवाल उपस्थित होत आहे. 

औरंगाबाद शहराचे नामकरण 'छत्रपती संभाजीनगर' असे करून अस्मितेचे व भावनेचे राजकारण करू पाहणारे सेना व भाजप, तसेच या नामांतराला विरोध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मोर्चे काढून आपले शक्ती प्रदर्शन करणारे एमआयएम सारखे पक्ष यांच्या प्रवृत्ती सारख्याच आहेत. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून भावनिक मुद्दे उकळून काढून आपली व्होट बँक मजबूत करणे हेच सध्या सुरू आहे. दुर्दैवाने वर्तमानापेक्षा इतिहासात रमणे अधिक पसंत करणारा आपला 'इतिहासजीवी' समाज अशा प्रकारच्या राजकारणाला सहज बळी पडतो व मूलभूत प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. यामुळे समाजाचीच हानी होते ही साधी गोष्ट देखील नागरिकांच्या मनात येत नाही. जागतिक वारसा लाभलेला जिल्हा तसेच राज्याची पर्यटन राजधानी अशी ख्याती मिळवलेल्या औरंगाबाद शहरात आजही अनेक मूलभूत समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हाकेच्या अंतरावर जायकवाडी धरण असतानाही स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी शहरातील नागरिकांना दररोज पिण्याचे पाणी पुरवू शकले नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील रस्त्यांची अवस्था आजही बिकटच आहे. औरंगाबाद जिल्हा आजही शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलाच आहे शहरात अथवा जिल्ह्यात एकही राष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्था नाही. आयआयएम सारखी व्यवस्थापन क्षेत्रातील महत्त्वाची संस्था औरंगाबाद शहरासाठी मंजूर होऊन केवळ लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे तत्कालीन युती सरकारच्या काळात नागपूरला पळवली गेली. अलीकडच्या काळातही क्रीडा विद्यापीठ मंजूर झाले होते. परंतु, आपल्याला सुविधांपेक्षा नामांतराचा रस असल्याचे येथील लोकप्रतिनिधींनी दाखवून दिले आणि त्याचाच परिणाम म्हणजे ते क्रीडा विद्यापीठही पुण्याला पळवण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारच्या महत्त्वकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पात औरंगाबाद शहराचा समावेश असला तरी येथील प्रशासन मात्र अद्यापही स्मार्ट झालेले दिसत नाही. जेणेकरून शहराला स्मार्ट म्हणावे असे एकही काम शहरात झालेले दिसत नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मनपा प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी शंभर स्मार्ट बस खरेदी तर केल्या परंतु, अद्यापही त्या सर्व शंभर बस रस्त्यावर कशा चालव्यात याचे नियोजन तीन वर्षात करणे प्रशासनाला जमलेले नाही. याचा परिणाम म्हणून बहुतांश स्मार्ट बस मुकुंदवाडी आगारात धुळखात उभे आहेत. यासारख्या अनेक मूलभूत समस्या शहर व जिल्ह्यात प्रलंबित असताना सरकार मात्र नामांतरासारख्या भावनिक राजकारणात व्यस्त आहे आणि दुर्दैव म्हणजे बहुसंख्या नागरिकही या राजकीय प्रयोगाचा एक भाग होण्यात आपल्याला धन्य मानत आहेत. शहराचे नामांतर झाले म्हणून रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करणारे आणि नामांतराच्या विरोधात मोर्चे काढून निषेध करणारे मात्र गेल्या अनेक वर्षात प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्न तसेच इतर समस्यांविरोधात कधीच रस्त्यावर उतरले नाहीत. या सर्व मंडळींनी शहराचे नामांतर झाले पण आता पुढे काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे... 

Wednesday, July 13, 2022

जसप्रीत बुमराह की गेंदबाजी के सामने इंग्लैंड की बल्लेबाज हुए ढेर


भारतीय टीम ने इंग्लैंड के खिलाफ वनडे सीरीज में जीत के साथ आगाज किया है। पहले एकदिवसीय मैच में भारतीय टीम ने इंग्लैंड को 10 विकेट से हराते हुए तीन मैचों की सीरीज में 1-0 से बढ़त हासिल कर ली। पहले खेलते हुए इंग्लैंड की टीम 25.2 ओवर में 110 रन पर आउट हो गई। जवाब में खेलते हुए भारत ने 18.4 ओवर में बिना विकेट गंवाए 114 रन बनाकर मैच अपने नाम कर लिया। 

टॉस हारकर पहले खेलते हुए इंग्लैंड की शुरुआत बेहद खराब रही। ओपनर बल्लेबाज जेसन रॉय बिना खाता खोले आउट हो गए। उनको बुमराह ने पवेलियन भेज दिया। इसके बाद जो रूट और बेन स्टोक्स भी खाता नहीं खोल पाए। दोनों को बुमराह और शमी ने आउट किया। बुमराह यहीं नहीं रुके और बेयरस्टो के अलावा लिविंगस्टोन को भी आउट कर दिया। बेयरस्टो ने 7 रन बनाए। लिविंगस्टोन खाता नहीं खोल पाए। जोस बटलर कुछ देर टिके लेकिन वह भी 30 रन बनाकर शमी का शिकार हो गए। बुमराह ने अपना पांचवां शिकार ब्रेडन कार्स को बनाया। वह 15 रन बनाकर आउट हुए, अंतिम विकेट के रूप में डेविड विली आउट हुए, उनको 21 रन पर बुमराह ने आउट किया। इस तरह इंग्लिश टीम 25.2 ओवर में 110 रन बनाकर आउट हो गई। बुमराह ने 19 रन देकर 6 विकेट झटके। शमी ने 3 और प्रसिद्ध कृष्णा ने 1 विकेट झटका।जवाब में खेलते हुए भारतीय ओपनर रोहित शर्मा और शिखर धवन ने धाकड़ बैटिंग की। दोनों ने इंग्लैंड के गेंदबाजों का सहजता से सामना किया। रोहित शर्मा आक्रामक मूड में दिखाई दिए। उन्होंने नियमित अंतराल पर गेंदों को सीमा रेखा से बाहर भेजा और अपना 45वां वनडे अर्धशतक पूरा किया। वह 58 गेंदों में 6 चौकों और 5 छक्कों के साथ 76 रन बनाकर नाबाद रहे। धवन 31 रन बनाकर नाबाद रहे। भारत ने 18.4 ओवर में बिना विकेट गंवाए 114 रन बनाकर मैच जीत लिया।

पहले एकदिवसीय मुकाबलेमे बांगलादेशने वेस्ट इंडिज को हराया

पहले एकदिवसीय मुकाबलेमे बांगलादेशने वेस्ट इंडिज को हराया

बांग्लादेश ने गुयाना में खेले गए पहले वनडे मुकाबले में वेस्टइंडीज को 6 विकेट से हरा दिया। बारिश की वजह से मुकाबला 41-41 ओवरों का हुआ। पहले बल्लेबाजी करते हुए वेस्टइंडीज की टीम 9 विकेट खोकर सिर्फ 149 रन ही बना पाई। जवाब में बांग्लादेश ने इस टार्गेट को केवल 4 विकेट खोकर 31.5 ओवर में ही हासिल कर लिया और सीरीज में 1-0 की बढ़त बना ली है। 

बांग्लादेश के कप्तान तमीम इकबाल ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया जो बिल्कुल सही साबित हुआ। पहले बैटिंग करने उतरी वेस्टइंडीज की शुरूआत अच्छी नहीं रही। महज 1 रन के स्कोर पर ही शाई होप के रूप में उन्हें बड़ा झटका लग गया। वो अपना खाता भी नहीं खोल पाए। 
इसके बाद काइले मेयर्स 10 और ब्रेंडन किंग 8 रन बनाकर आउट हो गए। वहीं कप्तान निकोलस पूरन भी बड़ी पारी नहीं खेल पाए 18 रन बनाकर चलते बने। टॉप ऑर्डर में शामराह ब्रूक्स ने 66 गेंद पर 33 रन बनाए। इसके अलावा निचले क्रम में एंडरसन फिलिप्स ने नाबाद 21 और जायडन सील्स ने नाबाद 16 रन बनाकर टीम को लड़ने लायक स्कोर तक पहुंचाया। बांग्लादेश के लिए शोरीफुल इस्लाम ने 4 और मेहदी हसन ने 3 विकेट लिए।टार्गेट का पीछा करने उतरी बांग्लादेश की शुरूआत भी अच्छी नहीं रही और सलामी बल्लेबाज लिटन दास केवल 1 रन बनाकर आउट हो गए। इसके बाद कप्तान तमीम इकबाल और नजमुल हुसैन शंटो के बीच 40 रनों की साझेदारी हुई। तमीम ने 33 और नजमुल ने 37 रन बनाए। इसके बाद महमदुल्लाह ने 69 गेंद पर नाबाद 41 रन बनाकर टीम को जीत दिला दी। नूरुल हसन ने भी नाबाद 20 रन बनाए।

Thursday, February 24, 2022

शिक्षण आणि शिक्षणसंस्थांना आलेले अपयश!


आपल्या देशात राजकारणासाठी अनेक मुद्दे असताना अलिकडे शिक्षण हाही राजकारणाचा विषय बनत आहे. हिजाबवरून कर्नाटकात शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्रातही त्याचे काही प्रमाणात पडसाद उमटले. उच्च न्यायालयानेदेखील विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे असेही सुनावले. या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्याचवेळी देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर आचार, विचार स्वातंत्र्याचा मुद्दादेखील चर्चेसाठी समोर आला. शिक्षणात धार्मिकतेचा विचार नको. सर्वांसाठी गणवेश सक्तीचे असावा, असे बरेच मुद्दे समोर आले. एकाचवेळी दोन धर्मांचे विद्यार्थी समोरासमोर आल्यानंतर काय घडते याचा कटू अनुभव देशाला पहावा लागला. ज्या वयात विवेकाची पेरणी करत विश्व समजावून घ्यायचे त्या वयात धर्माची पाऊलवाट चालणे पसंत करणे हे अनाकलनीय आहे.

खरेतर राज्यघटनेने आचार, विचार स्वातंत्र्य दिल्यानंतर त्याप्रमाणे जगण्याचे अधिकार प्रत्येक धर्माच्या आणि जातीच्या नागरिकाला दिले आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचरणाप्रमाणे वर्तन करण्याचा, पंरपरा जोपासण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने प्रत्येक धर्मीयांना दिले आहे. जे राज्यघटनेने दिले आहे ते त्यांना उपभोगण्यासाठीचे स्वातंत्र्य देण्यास काय हरकत आहे? कोणी कोणाच्या खासगी जीवनात कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेप करू नये हे खरेच, पण आपले अधिकार उपभोगत असताना त्याचा परिणाम इतरांच्या जीवनावर होता कामा नये याची काळजीदेखील घेण्याची गरज असते. शिक्षणातून साक्षरतेचा आलेख उंचावत असताना देशात अशा अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या होऊ लागतात तेव्हा हा विवेकी दृष्टीचा अभाव आहे हे निश्चित. शिक्षणातून विचार करण्यास प्रवृत्त करणारी पाऊलवाट आणि विवेकी वाट चालणारी दृष्टी देण्यास कमी पडलो हेच या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे कोणी काय म्हटले आहे ते योग्य की अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता किमान शिक्षणातून यायला हवी. तेच शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. ते झाले नाही तर अशा घटना हळूहळू मोठे स्वरूप प्राप्त करणारच. त्यातून समाजाच्या विकासाची प्रक्रिया गतीहीन होण्याची शक्यता अधिक आहे.

देशात शिक्षणाचा आलेख उंचावत असताना अशी एखादी घटना भोवतालात घडावी. त्या घटनेकडे विचाराने न पहाता ती घटना देशभर पसरवली जावी, आंदोलन उभे राहावे हे अनाकलनीय आहे. शिक्षणाने चांगले, वाईट या संदर्भाने विचार करण्याची शक्ती मस्तकात भरायची असते. ती भरण्यात आपण कमी पडलो आहोत. शिक्षणातून ज्ञान लादले जात आहे, पण विचार करण्यासाठी लागणारी प्रक्रिया होताना दिसत नाही. कोणतीही घटना चांगली वाईट हे आपल्या पंरपरा, पूर्वग्रहावर न ठरविता ती विवेकाने निश्चित करता यायला हवी. आपण कोणत्याही धर्मातील असलो तरी विचार मात्र विचार करता यायला हवा.

 समाजात जे जे वाईट आणि विकृत आहे ते दूर करणे हेच शिक्षणाचे काम आहे. विचाराची पेरणी शिक्षणातून केली गेली तर समाजात संधी साधून दुफळी माजविणार्‍या कोणालाही मोठे होता येणार नाही. कोणीतरी अल्पशिक्षित माणूस आवाहन करतो आणि ते अविवेकाचे, समाज, राष्ट्र आणि विद्यार्थ्यांचे अहित करणारे आहे की, हित साधणारे आहे याचा विचार न करता गर्दी उभी राहते. आंदोलनासाठी रस्त्यावर विद्यार्थी येतात तेव्हा तो शिक्षणाचा पराभव म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकातील आशय शिकवून मार्क्स मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे एवढेच नाही.

आपण जे शिकतो आहोत त्याचा संदर्भ जगण्याशी जोडणे आहे. त्या आशयाला जीवनाच्या प्रगतीच्या दिशेने जोडणे गरजेचे असते. आज शिक्षणात जे काही शिकतो आहोत. त्याचा संबंध जीवनाशी नाते सांगत नाही. केवळ परीक्षेपुरते शिकणे होत असल्याने आणि शिक्षक, पालक यांनाही माणूस घडविण्यापेक्षा मार्कांचा आलेख उंचावण्यासाठी ज्या शाळा प्रयत्न करतात त्याच अधिक स्मार्ट वाटू लागल्या आहेत. त्यामुळे समाजात अशा घटना घडल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याला प्रतिसाद मिळत जातो. त्यातून समाज, राष्ट्राचे आपल्या वर्तनाने काही अहित घडते का? याचा विचारही गमावला जात आहे, असे अनेक घटनांतून वारंवार समोर येत आहे. समाजाचे जेव्हा विवेक, विचार आणि शहापणापासून दुरावणे होते तेव्हा भावनाचा खेळ सुरू होतो. विवेक हटला की विकार समाजमनावर अधिराज्य करत जातो. अशी दूरवस्था निर्माण झाली की समाजाच्या संवेदना बोथट होतात. समाज असंवेदनशील बनणार असेल तर त्यातून राष्ट्र व समाजाला धोका निर्माण होतो. समाजात ज्या शिक्षणाने विचार पेरायचे ते शिक्षणही मग अविवेकाची वाट चालू लागते. तेथे विचाराची पेरणी होण्याचे थांबते.

जिथे जिथे विचार, शहाणपण असते तेथे धर्माच्या भिंतीपेक्षा माणूसपण अधिक महत्वाचे वाटते. मग माणुसकीसाठी आपण कोणत्या धर्माचे आहोत हे लक्षात घेण्याची गरज पडत नाही. जगातील कोणताही धर्म हा माणसात द्वेष, मत्सर, राग, अंहकार निर्माण करण्याची भूमिका घेत नाही. संत ज्ञानेश्वरांनीदेखील म्हटले आहे की, संत तिथे विवेक असणे केजी. तो विवेक पेरला गेला होता. महाराष्ट्रातील मातृहृदयी लेखक साने गुरूजी यांनी धर्माचा विचार सांगताना म्हटले होते की, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा भाव आपण शाळा-महाविद्यालयात रूजविण्याची गरज वर्तमानात अधिक अधोरेखित करताना दिसत आहे. सामान्य माणसांच्या जीवनात धर्माचा फारसा प्रभाव नसतो. कोरोनाच्या काळात अनेक मुस्लीम धर्मीय लोकांनी हिंदू लोकांवर अंत्यसंस्कार केल्याची उदाहरणे माध्यमातून पुढे आले होती. हिंदूनी मुस्लिमांसाठी मदतीचा हात दिला.

आज ग्रामीण भागात हिंदू आणि मुस्लीम समाजाची कुटुंबे एकत्र राहतात. त्यांच्यात होणारी देवाणघेवाण त्यांच्यातील बंधूभाव दाखवतो. मात्र सध्या हिजाब परिधान करण्यावरून जो संघर्ष सुरू आहे, असे काही समोर आले की मग मने अधिक धार्मिक आणि कट्टर होण्याचा धोका निर्माण होतो. ही कटूता आणि कट्टरता व्यापक समाजहित आणि देशाच्या प्रगतीसाठी मारक असते. त्यामुळे शिक्षणातून धर्मनिरपेक्षतेचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेने पेलण्याची निंतात गरज आहे. ती धर्मनिरपेक्षता म्हणजे जगातील सर्वधर्माचा सन्मान करणे आहे. आपलाच धर्म खरा असे नाही हेही लक्षात घ्यायला हवे. स्वामी विवेकानंद 1893 ला शिकागोच्या परिषदेत माझ्या बंधू आणि भगिनींनो, असे म्हणत धर्माचा खरा विचार पेरला होता. तो वर्तमानात पेलला गेला नाही तर समाजव्यवस्था घनदाट अंधाराच्या खाईत लोटली जाण्याची शक्यता आहे.

आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. शाळा महाविद्यालयात ज्ञानापेक्षा धर्म मोठा ठरू नये. धर्म ही प्रत्येकाची खासगी गोष्ट आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात त्याचे दर्शन आणि प्रदर्शन घडू नये. सार्वजनिक जीवनात आपण केवळ भारतीय असायला हवे. धर्मनिरपेक्षता म्हणजे प्रत्येकाने एकमेकाच्या धर्माचा आदर करणे असते. धर्माच्या आधारे एकमेकांवर हल्ले करणे नाही. 

✒️ नवनीत कुमार तापडिया

Sunday, July 5, 2020

राज्यात 'अनलॉक की लॉकडाऊन' ?



संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात लॉकडाऊन लागु करुन आज शंभराहून अधिक दिवस उलटुन गेलेत. सुरुवातीला लॉकडाऊन हे चार ते पाच आठवड्यांपुरते असेल असा लोकांचा समज होता, मात्र लॉकडाऊन काळात आवश्यक कोरोना चाचण्या न झाल्याने कोरोना बाधीतांची संख्या कमी होती परंतु आता दिवसेंदिवस कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असल्याने बाधीतांची संख्या देखील वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागु करत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु आज शंभराहून अधिक दिवस उलटुन गेल्यावर देखील आपण साखळी तोडण्यास अपयशी ठरलो असल्याचे दिसत आहे. उशिरा लॉकडाऊन लागु करण्याची मोठी किंमत अन्य देशांना चुकवावी लागली. भारतात तसे होऊ नये म्हणुन सरकारने लवकर लॉकडाऊन लागु करत त्याचे निर्बंध देखील इतर देशांच्या तुलनेत कडक ठेवण्यात आले. पहिल्या महिन्यातच कोरोना संसर्गाची साखळी तोंडुन जगात विक्रम स्थापित करण्याचे मनसुबे केंद्र सरकारचे होते मात्र ते सफल झालेले दिसत नाही.

नागरिकांचे जीव वाचविण्यास कोणतेही सरकार प्राधान्य देते त्यानुसार लॉकडाऊन समर्थनीय ठरतो. परंतु लॉकडाऊन लागु करुन शंभराहून अधिक दिवस उलटुन गेल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेचा गाडा देखील चालु करणे आवश्यक झाले होते. हे लक्षात घेऊन जुन च्या मध्यानंतर राज्यात मिशन बिगन अगेन म्हणजेच अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊन हा शब्दच हद्दपार करायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत असले तरी यावरून सरकारमध्ये मतभेद आहेत.

मिशन बिगिन अगेनची घोषणा करत लॉकडाऊन उठवला जातो पण चार दोन दिवसांनी एक दोन कोरोना बाधीतांची वाढ झाली की त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तिथे संचारबंदी लागू करत आहेत. आधी शहरात बंदीचा निर्णय घेतला जातो, पण तो अचानक संपूर्ण जिल्ह्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवास बंदी उठत नाही, त्यामुळे राज्यातील माणुस आपल्या घरीच अडकुन पडलाय. मात्र थोड्या प्रमाणात का होईना रेल्वे चालु असल्याने परराज्यातील परप्रांतीय त्यांच्या मुळ गावी जाऊन महिनाभर आराम करून परत मुंबई पुण्यात कामाला येत आहेत परंतु भुमिपुत्रांना रोजगार देण्याची सरकारने केलेली घोषणा हवेतच विरली असल्याचे दिसत आहे. अर्थचक्र बंद पडले आहे ते उघडायचे आहे, पण राज्यातील वाहतूक व्यवस्था चालु करायला राज्य सरकार तयार नाही. एकीकडे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवत आहेत परंतु राज्यात वाहतूक व्यवस्था चालु नसल्याने हे कामगार कामावर जाण्यास असमर्थ आहेत. काही कामगार आपली स्वत: ची गाडी घेऊन जात असले की त्यांच्या गाड्या जप्त केल्या जात आहेत. मग लोक कामावर कसे जाणार ? परिणामी यामुळे त्यांच्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. एकीकडे राज्यातील कामगार देशोधडीला लागले असले तरी सरकार सांगत आहे संयम ठेवा. रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता तसा हा प्रकार आहे.

राज्यातील व्यवहार टप्याटप्याने सुरु करता यावेत यासाठी राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन सुरू केले पण आता या मिशन चा पुरता फज्जा उडाला आहे. कोरोनावर प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय असु शकत नाही. आता शंभर दिवस उलटल्यानंतर सरकारने हळुहळु सर्व सुरू करणे आवश्यक आहे. एकीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की आता राज्यात लॉकडाऊन नाही फक्त अनलॉक अन् लगेच दुसरीकडे सरकारने राज्यात लॉकडाऊनची मुदत 31 जुलै पर्यंत वाढविण्याचे जाहीर केले. यावरुन राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. मुंबई मध्ये दोन किलोमीटर परिघाबाहेर न फिरण्याचा गोंधळ तर ठाण्यात पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांमध्ये आयुक्त बदलण्यात आले. परभणी आणि बीड जिल्ह्यात चार पाच रुग्ण वाढले की तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी चार पाच दिवसांचे लॉकडाऊन लागु केले. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या सात हजारांच्या उंबरठ्यावर असताना तिथे लॉकडाऊन नाही. अशीच परिस्थिती राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आहे. जालना, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक या जिल्ह्यात देखील स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन लागु केले आहे आणि राज्य सरकार मात्र अनलॉक ची भाषा करत आहे. या जिल्हाधिकाऱ्यांना माझा एकच प्रश्न जर शंभर दिवसात कोरोना संसर्गाची साखळी तुटत नसेल तर या चार, सहा दिवसांच्या संचारबंदीने काय होणार आहे ? यामुळे कोरोना पळुन जाणार आहे का ? जिल्हाधिकारी राज्यकर्ते झालेत आणि मंत्री, पालकमंत्री आमदारांना कोणी विचारत नाही. जर असे लॉकडाऊन - लॉकडाऊन खेळायचे होते तर 'मिशन बिगीन अगेन'च्या ऐवजी 'मिशन लॉकडाऊन अगेन' अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला हवी होती. यावरुन एक प्रकारे महाराष्ट्रात 'प्रशासकीय राजवट' लागु आहे असे दिसत आहे.

सरकार आणि प्रशासनाच्या या गोंधळात आज गोरगरीब रस्त्यावर आला आहे. लोक जगण्यासाठी बाहेर पडत आहेत, पण रोजगार कधीही हिरावून घेतला जाईल अशी भिती आहे. राज्यातल्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, ज्यांच्या आहेत त्यांचे पगार निम्म्यावर आहेत. एकीकडे सरकार म्हणते कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुर्ण पगार द्यावा अन् दुसरीकडे सरकारला सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत परंतु मंत्र्यांना कोट्यावधी रुपयांची वाहने घेण्यासाठी आहेत. पण जर असे लॉकडाऊन चालुच राहिले तर कंपन्यांकडे सुद्धा पैसे कुठून येतील याचा विचार सरकारने करावा. अशा संकटकाळात सरकार व प्रशासनाने सोबत विचार विनिमय करून एखादा निर्णय घेणे अपेक्षित असते परंतु राज्यात सरकार आपल्याच सरकार मधील रुसवे फुगवे दुर करण्यात व्यस्त आहे आणि प्रशासन मात्र सरकार चालवत आहे असे चित्र राज्यात दिसत आहे. एकीकडे सरकार अथवा सरकारमधील मंत्री म्हणतात राज्यात आता अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि दुसरीकडे लगेच स्थानिक जिल्हाधिकारी संचारबंदी लागू करतात यावरून राज्यात नेमकं अनलॉक आहे की लॉकडाऊन हा प्रश्र्न राज्यातील जनतेच्या मनात आहे. 

✒️  नवनित कुमार तापडिया

Wednesday, June 17, 2020

शाळा, परीक्षा आणि कोरोनाच्या ‘चक्रव्युहा’त अडकलेला महाराष्ट्र !

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्याच्या 60 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व विद्यापीठांच्या अंतीम वर्षाच्या परिक्षा वगळता बाकीच्या सत्राच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या. आता जवळजवळ 25 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेची चिंता नाही तसेच नापास होण्याचीही चिंता नाही. तसेच यासह कोरोना विषाणू चा वाढता प्रभाव पाहता राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या, अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करावे ही यातील एक उपाययोजना. ही उपाययोजना सुचविण्याचे डोके प्रशासकीय सचिवांचे की एखाद्या नेत्याचे यापैकी कोणाचे आहे हे अजुन स्पष्ट झालेले नाही. प्रशासकीय परीक्षांचा अनुभव पाठीशी असलेल्या सचिवांकडुन अशी उपाययोजना सुचविले जाण्याची शक्यता धुसर आहे. विद्यार्थी व पालक वर्गात लोकप्रियता मिळविण्याचा सोस बहुधा नेत्यांनाच असावा. सुरक्षितता व आरोग्यास धोका ही भावनिक कारणे दाखवुन परीक्षा रद्द केल्या की विद्यार्थी व पालक वर्ग खुश होईल अशी नेत्यांची धारणा असावी. यामध्ये लक्षावधी युवकांच्या भविष्याचे नुकसान होत असले तरी विनासायास परीक्षेत पास होण्याचे समाधान विद्यार्थी वर्गाला द्यावे व लोकप्रियता मिळवावी हा उदात्त हेतू यामागे असावा.

सृष्टीवर आपत्ती येते आणि जाते, पण परीक्षेचे प्रमाणपत्र हे आयुष्यभर चालणारे असते. अंतिम वर्षाची परीक्षा हा केवळ उत्तीर्ण होण्याचा विषय नसतो. त्यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. माणुस कितीही शिकला तरी पदवी परीक्षेत किती गुण मिळाले याची चाचपणी कुठेही नोकरी देताना नेहमी केली जाते. त्यावेळी 'कोविड-उत्तीर्ण' असा शेरा बसलेला असेल तर तो डाग विद्यार्थ्यांना आयुष्यभर बाळगावा लागेल. सन 1950 च्या सुमारास विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका घेऊन जाणाऱ्या रेल्वे बोगीला आग लागल्याने सर्व उत्तरपत्रिका जळाल्या होत्या. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित केले होते. या विद्यार्थ्यांचा उल्लेख "जळकी बी. ए." असा काही दिवस करण्यात आला होता. तसे यावेळी केले तर त्यांना 'कोरोना इफेक्ट' असेही कदाचित म्हटले जाईल. कोविड काळात शारीरिक अंतर ठेवून परीक्षा घेता येत नाही हा युक्तिवाद फसवा आहे. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेता येऊ शकतात. अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असल्याने शारीरिक अंतर ठेवून परीक्षा घेणे अशक्य नाही. सध्या कोरोना राजधानी बनलेल्या मुंबई सह कल्याण-डोंबिवली मध्ये बस पकडण्यासाठी होणाऱ्या गर्दीपेक्षा अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी होणारी गर्दी खुपच कमी असेल. मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यात अशा परीक्षा घेतल्या आहेत. प्रशासन व सरकारने मनात आणले तर विद्यापीठातुन परीक्षा घेणे अशक्य नाही. किंबहुना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या म्हणण्यानुसार या संकटाला एक आव्हान म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्येही परीक्षेला बसण्याची हिम्मत निर्माण केली पाहिजे. स्पर्धात्मक जगाचा एकीकडे घोष करायचा आणि स्पर्धेसाठी आवश्यक असणारी परीक्षा टाळायची, ही विसंगती विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी आहे. 

एकीकडे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परीणाम करणाऱ्या अंतिम वर्षाच्या परिक्षा विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका व सुरक्षितता हे भावनिक कारण दाखवून रद्द करण्याचा अनावश्यक निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु आता कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देखील राज्य सरकारने 1 जुलै पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याला दुटप्पीपणा म्हणावा की अजुन काही ? काहो, 1 जुलै पासून महाराष्ट्र कोरोना मुक्त होणार आहे का ? अन् जर नसेल होणार तर आता नाही का राज्य शासन व पालकांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी ? की शाळेतले विद्यार्थी मतदान करत नाहीत आणि पदवीचे तसेच अंतिम वर्षाचे विद्यार्थी मतदान करु शकतात म्हणुन त्यांच्या आरोग्याची काळजी राज्य शासनाला असेल आणि शाळेतील मुलांची काळजी यामुळे नसेलही. 

राज्य शासनाने 1 जुलै पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला यासाठी एक विशिष्ट नियमावली तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये जिथे कोरोना रुग्ण नाहीत त्या गावात प्रत्यक्ष तर जिथे कोरोना रुग्ण आहेत याठिकाणी ऑनलाईन किंवा डिजिटल शिक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेतला. आता बहुतांश गावांमध्ये शाळांचा कोरोना काळात 'क्वारंटाईन सेंटर' म्हणुन वापर करण्यात आला. यामुळे जिथे प्रत्यक्ष शाळा सुरू होतील तिथे त्या शाळेचे निट निर्जंतुकीकरण करण्यात येईल का ? हा एक प्रश्नच आहे. इथे काही गावांमध्ये 4-4 दिवस विजपुरवठा खंडित असतो, काही गावात इंटरनेटची पुरेशी व्यवस्था नाही अशा ठिकाणी ऑनलाईन तसेच डिजिटल शिक्षण कसे शक्य आहे याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकारच्या अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना धड छत नाही, धड भिंती नाहीत संगणक देखील नाहीत आणि सरकार अशा शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचे स्वप्न‌ पाहत आहे. हे स्वप्न कितपत सत्यात उतरेल हे तर येणारा काळच सांगेल. सरकारने अनेक शाळांच्या नुतनीकरणासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला परंतु तो निधी खरच तिथे वापरला गेला की नाही हे मात्र शासनाला माहीत नाही. असे अनेक प्रश्न असले तरी राज्यातील बहुतांश शाळा व शैक्षणिक संस्था या राजकीय नेत्यांच्या आहेत त्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असावा ही शक्यता नाकारता येत नाही. कारण शाळा सुरू झाल्या म्हणजे विद्यार्थी व पालकांकडून फीस घेता येईल हा हेतु असावा यातुन राज्यशासनाला  शिक्षणाचा खरच कळवळा आहे की फक्त आर्थिक लळा आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

महाराष्ट्रात सध्या बहुतांश ठिकाणी 15 जुन पासून शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु जिल्हाबंदी असल्याने अनेक शिक्षकांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. हीच परिस्थिती विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील घडणार आहे. परंतु महाराष्ट्रात जिल्हाबंदी ही केवळ नकाशावर आहे. प्रत्यक्षात राज्यात कुठेही जिल्हाबंदी नाही. जिल्हाबंदी केवळ शासनाच्या बसेस आणि रेल्वे साठी आहे. बाकी ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन आहेत ते सऱ्हास आपले वाहन घेऊन फिरून येतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे औरंगाबाद शहरात 4-5 दिवसांपूर्वीच झालेले हत्याकांड, औरंगाबाद शहरातील सातारा परीसरात जालना येथुन व्यक्ती येऊन बहीण भावाचा खुन करु शकतात तर कसली जिल्हाबंदी अन् कसलं काय ? जर खरच जिल्हाबंदी असती तर हे खुनी जालन्याहुन जिल्हा बदलुन औरंगाबाद शहरात आलेच नसते आणि खुनाचे हत्याकांड घडलेच नसते. तसेच मुंबई महानगर (MMR) परीसरात कोरोना रुग्ण दिवसागणिक वाढत असताना तिथे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाबंदी काढुन टाकली इतकेच नव्हे तर तिथे लोकल सह बसेस चालु केल्या अन् उर्वरित राज्यात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नसताना देखील मुख्यमंत्र्यांनी जिल्हाबंदी उठविण्याची औपचारिक घोषणा केली नाही. यामागचे लॉजिक त्यांनाच माहीत असावे. एकंदरीतच सध्या राज्याची परिस्थिती "अंधेर नगरी चौपट राजा" अशी झाली आहे. हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल.

 ✒️ नवनित कुमार तापडिया, औरंगाबाद

Monday, June 1, 2020

जनता जनार्दन आणि सोशल डिस्टेंसिंग !

जनता जनार्दन आणि सोशल डिस्टंसिंग !

 कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतासह जगभरातील अनेक देशाने लॉकडाऊन पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्रात देखील मागील 70 दिवसांपासून जिवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. परंतु इतके दिवस सर्व बाजारपेठ बंद असल्याने अर्थव्यवस्था देखील मजबूत करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन सरकारने आज पासून लॉकडाऊन मध्ये बऱ्याच सवलती दिल्या आहेत. देशव्यापी लॉकडाऊन करुन 70 दिवसांहुन अधिक कालावधी होऊनही कोरोना विषाणू वर अपेक्षित नियंत्रण सरकारला मिळवता आले नाही. परंतु इतके दिवस झाल्यामुळे आता मजबुरीने का होईना सरकारला आता दुकाने आणि बाजारपेठ सुरू करणे भागच होते. आता आपल्या स्वत:लाच आपली स्वत:ची काळजी घ्यावी लागेल यात दुमत नाही.

तब्बल 70 दिवसांनी आज मार्केट सुरू झाले आणि मार्केटमध्ये गेलो आणि मार्केट मधली परिस्थिती बघून हा थ्रेड लिहावासा वाटला ! आज सरकार वर नाही, मला आपल्या लोकांवर टीका करायची आहे! त्यात मी सुदधा आहे. लोकांना किती जाणीव आहे या कोरोनाची ? खरच लोक सोशल डिस्टेंसिंग पाळत आहेत का ? असे अनेक प्रश्न बाजारपेठेत गेल्यावर मला पडले.

मार्केट मध्ये गेल्यावर लोक आपल्या आजूबाजूला काहीही झालेलं नाही या अविर्भावात जगत होते! बहुतांश लोकांच्या तोंडाला मास्क नाही आणि सोशल डिस्टेंसिंग तर जणु लोकांना माहीतच नाही ! बहुतांश दुकानासमोर लोक अशी काही गर्दी करून उभे होते जणू आजच सगळं सामान संपणार आहे. नेहमीप्रमाणे आपल्या गाडीचा हॉर्न वाजवत फिरणारे गाडीवर दोन- तीन जण घेऊन असे फिरत होते जणु कोरोना यांनीच बनवलाय आणि यांना तो होणारच नाही. रस्त्यानी जाताना लोक अजूनही थुंकत आहेत! मार्केट आज प्रचंड गजबजलेलं होतं, दुकानं खचाखच भरलेली! 

दारू तर लोक असे विकत घेत होते की दारू जर नाही पिली तर ते लगेचच मरतीलच! या सगळ्यात मला वाईट त्या लोकांचं वाटतं जे खऱ्याअर्थाने लॉकडाऊन पाळत आहेत. मान्य आहे सरकार बऱ्याच बाबतीत चुकले आहे, सरकार वर आपण टीका करत आहोत, काही जण राज्य सरकारवर तर काही जण केंद्र सरकारवर! पण लोकांमध्येच जर या गोष्टीची खबरदारी नसेल तर कुठे कुठे  पोहोचणार सरकार ? आता कोणतंही सरकार असो तुम्हाला हाताला धरून घरी बसायला घेऊन जाणार नाहीये! तुम्हाला स्वतःची काळजी घेणंच या सगळ्यात आवश्यक आहे ! नशिबाने काही शहरात एकही रुग्ण नाही, पण म्हणून इतकी बेफिकिरी ? उद्या जर काही झालं आणि कोरोना नसलेल्या शहरांत जर कोरोना पसरला तर कुणाला नाव ठेवणार आहात ? यात स्थानिक पातळीवर सुद्धा तितकीच दक्षता घेणं गरजेचं आहे ! दुर्दैवाने तसे होताना मुळीच दिसत नाहीये. 


सरकार ची चूक आहे की नाही हा प्रश्नच वेगळा आहे पण लोकांची देखील चूक आहे यात दुमत नाही ! लोक, सगळं नॉर्मल झाल्यासारखं जे वागत आहेत ते फार घातक आहे आपल्या शहरासाठी, राज्यासाठी आणि परिणामी देशासाठी ! खरच, आपल्या देशात सुजाण नागरिकांची प्रचंड टंचाई आहे ! आज बाजारपेठेत जे काही दृश्य पाहिलं ते घाबरवून टाकणारं होतं ! एका ठिकाणी रोज स्वतःच्या मनाला सांगड घालायची की लवकरात लवकर हे सगळं बरं होऊन आपण आपल्या नॉर्मल लाईफ ला लागणार आहोत आणि दुसरी कडे असं वागायचं !

जो पर्यंत आपल्या देशातल्या लोकांच्या मनात एकंदरीतच जाणते पणा येत नाही, आपण या देशाचे नागरिक आहोत आपल्या पण काही जबाबदाऱ्या आहेत हे जो पर्यंत लोकांच्या लक्षात येत नाही तो पर्यंत कोणीही कितीही प्रयत्न केला तरी देशाची प्रगती होणं अजिबात शक्य नाही आणि आजकाल जे ट्रेंडमध्ये आहे ना 'आत्मनिर्भर भारत' ते तर मुळीच शक्य नाही ! 

असो,जे होईल ते होईल म्हणायचं आणि पुन्हा स्वतःला घरात डांबून ठेवायचं !

✒️ नवनित कुमार तापडिया 

147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट...

Happy Birthday Test Cricket: 15 मार्च हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. 147 वर्षांपूर्वी म्हणजेच 1877 मध्ये आजच्याच दिवशी कसोटी क्र...