Monday, July 29, 2019

प्रेम

                                           
      प्रेम हा शब्द उच्चारताच आपल्या मनात अनेक आठवणी येतात. कारण या जगातील प्रत्येक जण कोणावर न कोणावर प्रेम करतोच. कोणी माणसांवर करतो तर कोणी प्राणिमात्रांवर......
    आजच्या या एकविसाव्या शतकात आपण दररोज सकाळी वर्तमानपत्र उघडले की वाचायला मिळते कुठे प्रेमि-प्रेमिका सोबत आत्महत्या करतात तर कुठे मुलगा करतो तर काही ठिकाणी मुलगी करते. सर्व मोठे लोक ते वाचतात अन त्यांना नाव ठेवतात, अन त्यात जर एखाद्या मुलीची गोष्ट असली की लगेच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो, तिला नाव ठेवले जाते. का हो एखाद्या मुलीने प्रेम केले म्हणजे गुन्हा केला का? मुलींना प्रेम करण्याचा हक्क नाही का?
      मुलीचे आई-वडील तिला लहानपणापासून सांगतात, तु खुश तर आम्ही खुश मग ती जर एखाद्या मुलांसोबत खुश राहात असेल तर राहुद्या ना, पण नाही आपण चंद्रावर जायचे स्वप्न बघतो परंतु एखाद्या मुलीने तिच्या पसंतीने तिचा जिवन साथी निवडावा हे छोटंसं स्वप्न नाही का हो बघु शकत? निश्र्चितच बघु शकतो परंतु आपल्याला एकच भिती असते समाज व समाजातील लोक काय म्हणतील? अहो लोकांना तेवढेच काम असतात. पण आपल्या मुलीपेक्षा आपल्याला आपली प्रतिष्ठा महत्वाची असते. अन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जात. अरे हे असं किती दिवस चालणार?
       एकीकडे आपण म्हणतो तुझ्या खुशीत आमची खुशी अन ति जर एखाद्या पर जातीय मुलासोबत खुश असते, तेव्हा कुठे जाते तुमची खुशी अरे हा तेव्हा आपल्याला तिच्या खुशी पेक्षा समाज, जात महत्त्वाची वाटायला लागते. अन मग मुलीने आई-वडीलांच्या इच्छेविरुद्ध आपला जिवन-साथी निवडला की लगेच तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा ही कुठली प्रगती?
      मुलगी मोठी झाल्यावर तिला विचारा तिला कसा नवरा पाहिजे, तिच्या पसंतीने तिला तिचा जिवन साथी निवडु द्या कारण हा तिचा हक्क आहे मग त्यात जात, समाज हे सर्व विसरून जा. असे किती दिवस जातीच्या बंधनात अडकणार आहोत आपण?
    अन आई-वडिलांनी तिच्या मर्जिविरुद्ध लग्न करायचे अन मग मुलगा किंवा तिच्या सासरचे लोक चांगले नाही निघाले तर मग मुलगी पण जाते अन समाजातील प्रतिष्ठा पण कारण समाज तर हेच  म्हणेल की आई-वडिलांनी काय डोळे झाकून मुलीचे लग्न लावले होते का?
    मला एवढेच सांगायचे आहे की, किमान एकदा तरी आपल्या मुलींना विश्वासात घेऊन विचारा. अन समाज व जात हे बंधन तोडून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण प्रेम होण ही काही सोपी गोष्ट नाही. त्या प्रेमाची किंमत करा. कारण आयुष्यात खरं प्रेम एकदाच होत. अन तुमच्या मुला-मुलींना खुश किंवा जिवंत ठेवा असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
      आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की मुलगी कधीच तिच्या आई-वडिलांना दुखवत नाही पण प्रत्त्येक गोष्टीला मर्यादा असतात,अन मग ति बिचारी तिच जिवनच संपवुन टाकते..........

सोच बदलो; देश बदलो

    ✒ - नवनित कुमार

1 comment:

147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट...

Happy Birthday Test Cricket: 15 मार्च हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. 147 वर्षांपूर्वी म्हणजेच 1877 मध्ये आजच्याच दिवशी कसोटी क्र...