Friday, February 21, 2020

बदलता काळ आणि शिवजयंती

नुकतीच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. अनेक ठिकाणी राजेंच्या जयंतीनिमित्त ढोल- ताशांच्या गजरात तसेच DJ वाजवून मिरवणूक काढण्यात आली. परंतु ईतक्या उत्साहात शिवजयंती करताना काही शिवभक्तांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय याचे भान राहीले नाही, तर काही शिवभक्तांना आपण राजेंची कितवी जयंती साजरी करतोय हेच माहीती नव्हते. तर त्यांच्या साठी सांगतो आज आपण महाराजांची 390 वी जयंती साजरी करतोय. आपल्याला जर इतकी सोपी आणि साधी गोष्ट माहीत नसेल तर खरंच आपण स्वत:ला शिवभक्त म्हणावे का ?

याव्यतिरिक्त जयंतीचा सोहळा पाहताना अनेक बाबींचा विचार मनात आला. काही जण आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर भगवे झेंडे लावुन फिरत होते. एकंदरीत हे चित्र पाहील्यावर भारत जणु हिंदुस्थान झाल्यासारखे वाटले. आपण महाराजांना आपले दैवत मानतो, त्यांची प्रतीमा असलेले झेंडे आपल्या वाहनांवर फडकवतो पण जयंती झाल्यावर त्या झेंड्यांच काय होत ? कुठे ते पायदळी तुडवले जातात तर कुठे कचऱ्यात मग हा आपल्या दैवतांचा अपमान नाही का हो ?

तसेच जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी DJ च्या तालावर तरुणाई थिरकली काही ठिकाणी तर नाचणारे टुल्ल होऊन नाचत होते मग आपण जर असं टुल्ल होऊन नाचत म्हणायचं राजे पुन्हा जन्माला या या गोष्टीला काही अर्थ आहे का ? हीच शिकवण आहे का महाराजांची ? जयंतीनिमित्त जयंती साजरी करणाऱ्या मंडळींनी जर DJ ऐवजी महाराजांचे पराक्रम सांगणाऱ्या पोवाड्यांचा कार्यक्रम तसेच मिरवणुकीत DJ ऐवजी जर महाराजांच्या पराक्रमाचे जिवंत देखावे  ठेवले तर चिमुकल्या लहान मुलांना देखील आपल्या महापुरुषांचे पराक्रम समजतील. तसेच मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हारयल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी महाराजांची मूर्ती घेऊन जात आहे तर सगळे तिच्या पाया पडत आहेत. परंतु मुर्ती हातात नसताना तेच पाया पडणारे त्या मुलीकडे वाईट नजरेने बघतात हीच का महाराजांची शिकवण ? मुर्ती हातात नसताना पण अशीच मुलींची इज्जत केली तर पहील्यासारखे महाराजांचे स्वराज्य होण्यास वेळ लागणार नाही.

एकंदरीत मला इतकंच सांगायचं आहे की, आपल्या देशात अनेक पराक्रमी महापुरुष होऊन गेलेत मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉ बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णा भाऊ साठे असतील छत्रपती शाहू महाराज असतील यांच्या जयंतीदिनी आपण DJ समोर शांताबाई सारख्या गाण्यांवर न नाचता त्यांनी केलेले पराक्रम समाजाला सांगितले पाहिजे तसेच त्यांचे विचार आणि आचरण आपल्या वागण्यात आणले तर खऱ्या अर्थाने त्यांची जयंती साजरी होईल.

बघा पटतंय का ?

✒️ -  नवनित कुमार तापडिया 

147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट...

Happy Birthday Test Cricket: 15 मार्च हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. 147 वर्षांपूर्वी म्हणजेच 1877 मध्ये आजच्याच दिवशी कसोटी क्र...