Sunday, May 10, 2020

सरकार आणि 'कणा' नसलेली जनता

सरकार आणि 'कणा' नसलेली जनता


जसा सर्व माणसांना पाठीचा कणा असतो ज्यामुळे आपण स्वतंत्र राहुन स्वत: आपल्या पायावर चालु शकतो. जर आपला तो कणा मोडला किंवा बिघडला तर निश्चितच आपल्याला दुसऱ्या वस्तुंची मदत घेऊन चालावे लागेल किंबहुना आपण स्वत: चालु शकत नाही. पण आजघडीला भारतातील जनतेकडे बघीतल्यास असे वाटते की जनतेकडे तो कणा राहीलेला नाही किंवा आहे तर लपवून ठेवला आहे कारण आपल्या देशातील जनतेला सर्वच गोष्टींमध्ये सरकार वर अवलंबुन राहण्याची सवय लागली आहे. तर काही बाबींमध्ये आपल्या राजकीय स्वार्थासाठी सरकारने तो कणा जनतेकडून काढुन घेऊन जनतेला अपंग केल्याचे चित्र आजघडीला भारतात दिसत आहे.

सध्या सर्व जगावर कोरोना विषाणू ने आक्रमण करून जवळपास 3 लाख लोकांना मृत्युमुखी पाडले तर 41 लाखांहून अधिक लोकांना जखमी केले आहे. अशा अतिसंवेदनशील परिस्थिती मध्ये जगातील इतर देशात प्रशासन आणि त्या देशाचे नागरिक एकमेकांना सहकार्य करत खांद्याला खांदा लावून या परिस्थितीतून मार्ग काढत आहे परंतु भारतात मात्र या विषाणू चे गांभीर्य अजुन प्रशासनाला आणि जनतेला तर मुळीच कळलेले दिसत नाही. अशा प्रसंगी सुद्धा जनता निव्वळ सरकार वर अवलंबुन राहत आहे आता यात जनतेचा तरी काय दोष म्हणा आतापर्यंत आपल्या राजकीय आणि मतांच्या धुव्रीकरणासाठी सरकारने जनतेला अपेक्षेपेक्षा जास्त मदत केलीच आहे त्यामुळे जनता आपल्या पायावर उभे राहण्याचे विसरून गेली आहे, तर अशा अतिसंवेदनशील परिस्थिती मध्ये सुद्धा सरकार आपल्याला मदत करेल या भ्रमात जनता वावरत आहे. परंतु अशा संकटकाळात आपण या देशाचे नागरिक आहोत या नात्याने आपल्या स्वत: च्या काही जबाबदाऱ्या आहेत हे मात्र जनता विसरून गेली आहे. सरकार आणि प्रशासनाकडून लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली मात्र जनतेने त्याला गाजर दाखवत आम्ही काही याचे पालन करणार नाही पण मात्र कोरोना ग्रस्तांची संख्या वाढल्यावर सरकार ने आमच्यासाठी काहीच केले याचे तुणतुणे वाजवु अशीच परिस्थिती सद्या आपल्या देशात आहे. सरकारने कोरोना आपत्तीला तोंड देण्यासाठी केलेले नियोजन निश्र्चितच चुकले परंतु आपल्या पण काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपण पाळतो का विचार जनतेने करायला हवा. काहीही झाले की सरकार वर अवलंबुन राखणे म्हणजे निव्वळ मुर्खपणाचे लक्षण आहे.

एकीकडे आपण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपान, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका यांसारख्या पाश्चिमात्य देशांचे दाखले देतो मग सद्यपरिस्थीतीबद्दल का आपण त्यांचे दाखले देत नाही. अमेरिकेच्या पन्नास राज्यांपैकी 5 ते 6 राज्यांमध्ये अजुनही तेथील स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन केलेले नाही. तेथील जनता या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वत: हुन नियम पाळत आहेत ते आपल्या सारखे सरकारवर अवलंबून नाहीत. तर याउलट आपल्या देशात लॉकडाऊन करुन जनता नियम न पाळुन काही कमी जास्त झाले की सरळ सरकारने काही तरी करावे असे म्हणुन मोकळे होते. आपल्याला जणु सवयच लागली आहे, पाऊस जास्त झाला सरकार काही करेल, पाऊस कमी पडला सरकार काही करेल, भुकंप आला सरकार काही करेल, अपघात झाला सरकार काही करेल अहो पण का ? कशासाठी ? मान्य आहे सरकारने जनतेला संकटकाळात मदत करावी आणि सरकारचे कर्तव्य आहे पण जनतेने सुद्धा आपल्या मर्यादेत रहायला हवे पण नाही आपल्याला सरकारने येऊन घास भरवला पाहिजे असे वाटते. पण कधी हा विचार केला नाही की सरकार कुठुन देत असेल तर सरकार विविध वस्तू वर कर वाढवुन त्यातुन मिळालेली रक्कम आपल्याला मदतीच्या स्वरूपात देते जी आपल्याला वाटते फुकट मिळाली आणि नंतर आपणच पुन्हा ओरडतो सरकारने महागाई वाढवली.

आता आत्ताचे ताजे उदाहरण घ्या, 2-3 दिवसांपूर्वी औरंगाबाद जवळ रेल्वेखाली चिरडून 16 मजुरांनी आपला जीव गमावला यात प्रशासनाचा काहीच हात नाही. पहिली गोष्ट म्हणजे रेल्वे रूळावरून चालणे म्हणजे दंडात्मक गुन्हा आहे. पण आपल्या देशात नियम हे तोडण्यासाठी बनतात याची प्रचीती देत नागरीक सऱ्हास रेल्वे रुळावरून फिरतात. आता हे मजुर देखील जालन्याहुन औरंगाबाद मार्गे भुसावळ आणि पुढे मध्य प्रदेशात जायला निघाले. पोलीसांच्या भितीने ते रेल्वे रुळावरून निघाले आणि चालुन चालुन थकल्यावर रेल्वे रुळावरच झोपले का हो ते बाजुला झोपु शकत नव्हते का ? आता यात रेल्वेने त्या मजुरांना चिरडले यात सरकारचा काहीच दोष नाही तरी आपल्याला अपेक्षा होती सरकारनेच काही तरी करावे हीच घटना एखाद्या पाश्चिमात्य देशात घडली असती तर तिथे या घटनेला आत्महत्येची संज्ञा दिली असती. परंतु इथे याही घटनेचे राजकारण करण्याचे काम काही तथाकथित गावठी चाणक्यांनी केले आणि त्याला महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी 5 लाख आणि मध्य प्रदेश सरकारने प्रत्येकी 5 लाख अशी मदत जाहीर करून राजकारण करण्यांना खत पाणी घातले आणि जनतेला पुन्हा आश्वस्त केले की तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू नका. दोन्ही राज्यांच्या राज्य सरकारांनी मिळुन त्या मृत मजुरांना दिलेले 1 कोटी 60 लाख रुपये जर दुसऱ्या मजुरांच्या कल्याणासाठी लावले असते तर अशी वेळ कदाचित भविष्यात येणार नाही. अशाप्रकारे सरकार मर्यादेपेक्षा आणि गरज नसताना मदत करुन जनतेला अपंग बनवत आहे आणि जनता सुद्धा प्रत्येक गोष्टीत सरकारकडून अपेक्षा ठेवून खुशी खुशीने अपंग होत आहे.

सरकारने आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जनतेला मुर्ख बनवत विविध गोष्टींचे अमिष दाखवुन त्यांना सरकारवर अवलंबून राहण्याचे शिकवले आणि जनतेने सुद्धा आपण नियम पाळणार नाही व त्यामुळे काही कमी-जास्त झाल्यास मात्र सरकारवर अवलंबून राहु कधीही स्वत: च्या पायावर उभे राहणार नाही असे ठरवले आहे आणि याचीच किंमत आता देशाला भोगावी लागत आहे. असे असले तरी बघा कोरोना विषाणू चे गांभीर्य लक्षात घेऊन जर आपण नियम पाळले तर सर्वांचे भले होईल.

✒️ नवनित कुमार तापडिया

12 comments:

  1. सहमत व परखड मत आवडले

    ReplyDelete
  2. अटल सत्य का यथार्थ विवेचन ✅✅

    ReplyDelete
  3. True.. really we hope less society living in democracy....we are so careless. Government not trying society can stand on there feet...Janta Also banat aahe ...Kam karnayas koni taiyar nahi

    ReplyDelete
  4. सरकार म्हणजे मायबाप, सगळं तेच करणार !!!
    आम्ही कर भरतो न ?!

    काही राज्यकर्ते मानाने, स्वकर्तुत्वाने जगायला शिकवत होते पण फुकटात सगळं हवं असलेल्या ना ते पचले नाही आणि काही निव्वळ स्वार्थी राजकारणी त्याला हातभारच लावतातय.

    परखड, एकदम बरोबर विवेचन आहे हे 👍

    ReplyDelete
  5. सरकार जबाबदार नाही अस बोलण चुकीच ठरेल,
    ज्यांचा जीव गेला ते माणस होते जऩावर नाही हे आधी लक्ष्यात घे, आणि एका बाजूने विचार करत आहे तु त्यांना, घरी रहा अस् सगळे ओरडून सांगत होते तेव्हा ते मालगाडी खाली मेलेले लोकाचे काय हाल् झाले असतील याचा अंदाज लावा एकदा, घर भाडे कुणीही घेऊ नये असे मोदी साहेब सगळ्यांचा पुढे tv वर् बोलत जरी अस ले तरीही आपल्या स्थानिक लोकांचे हाल त्यांना चार् भिंतींच्या आत माहित् आहेत,मग ते दुर् च्या गावचे लोक् त्यांचं ऐकून घ्यायला कोण रिकाm आहे??? आणि 1lakh 60thousnd मंजूर करण्यात आले, पण ते त्यांना मिळाले हे सिद्ध झाले का??? 1lakh 60thousnd सर्वांना दिस ले पण कोटी रुपयांचा निधी काही सेलिब्रिटीज ने दिला तो काय पूजा करण्यासाठी??? भारतात नियम बनतात् तोडण्यासाठी आणि करतो एक आणि भरतो दुसरा अशी अवस्था आहे आपली...

    ReplyDelete

147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट...

Happy Birthday Test Cricket: 15 मार्च हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. 147 वर्षांपूर्वी म्हणजेच 1877 मध्ये आजच्याच दिवशी कसोटी क्र...